Lalu Prasad Yadav health : लालू यांच्यावर आज किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; किडनी दान करण्यापूर्वी मुलीची भावूक पोस्ट | पुढारी

Lalu Prasad Yadav health : लालू यांच्यावर आज किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; किडनी दान करण्यापूर्वी मुलीची भावूक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस आजारांशी सामना (Lalu Prasad Yadav’s health) करणारे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना त्यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) या किडनी देणार आहेत. आज (गुरुवार, दि.५)  लालू प्रसाद यादव यांच्यावर  किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. रोहिणी यांच्या या किडनी दानाने लालू प्रसाद यांना नवं आयुष्य मिळणार आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येने (Lalu Prasad Yadav’s health) त्रस्त आहेत. त्यामुळे लालू प्रसाद आणि राबडीदेवी यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनी त्यांना किडनी देण्याचे ठरवले होते. या निर्णयानुसार आज रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांना किडनी देणार आहेत. आज सिंगापूरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

वडिलांच्या रुपात ईश्वराला पाहिलंय

रोहिणी या सिंगापूरस्थित आहेत. त्यांच्या किडनी देण्याच्या निर्णयावर लाल प्रसाद सहमत नव्हते. पण रोहिणी आणि कुटुंबियांच्या समजुतीनंतर ते शस्त्रक्रियेसाठी तयार झाले. यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, “या निर्णयाचा मला अभिमान वाटत आहे…” रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी रोहिणीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या” ईश्वराला मी पाहिलं नाही आहे. पण ईश्वराच्या रुपात पापांना पाहिलं आहे.”

प्रत्यारोपणानंतर मूत्रपिंड 70 टक्के काम करेल

रोहिणी यांनी आपली प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली आहे. यामध्ये निष्पन्न झालं आहे की, त्यांची किडनी ९० ते ९५ टक्के काम करत आहेत. तर  लालूंच्या दोन्ही किडन्या 28 टक्के काम करत आहेत. प्रत्यारोपणानंतर ते जवळपास ७० टक्के काम करू लागतील. आरोग्याच्या दृष्टीने एवढे पुरेसे मानले जाते.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सिंगापूरला रवाना

दरम्यान, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आरजेडीचे राष्ट्रीय सरचिटणीस भोला यादव शनिवारी रात्री सिंगापूरला रवाना झाले आहेत. राबडी देवी आणि मीसा भारती आधीच सिंगापूरमध्ये आहेत. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये लालूंवर किडनी प्रत्यारोपण होणार आहे. या रुग्णालयात भाजपचे माजी खासदार आरके सिन्हा, अमर सिंह आणि अभिनेते रजनीकांत यांच्यावर किडनी शस्त्रक्रिया झाली होती.

हेही वाचा

Back to top button