गोव्यात नववर्षाचे स्वागताच्या पार्श्वभूमीवर रात्री १० पर्यंतच पार्टी करण्याचे आदेश | पुढारी

गोव्यात नववर्षाचे स्वागताच्या पार्श्वभूमीवर रात्री १० पर्यंतच पार्टी करण्याचे आदेश

पेडणे : पुढारी वृत्तसेवा :  सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात होणाऱ्या जल्लोषी संगीत पार्यांमुळे ध्वनिप्रदूषण आणि लोकांना होणारा त्रास याची दखल घेत उच्च न्यायालयाने रात्री १० पर्यंत संगीत पार्टी करण्याचे आदेश दिले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे… त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाऊन पाय करण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मोरजी येथील मारबेला बीच रिसॉर्ट येथे शनिवारी (दि. ४) रात्री १० वा. नंतर संगीत रजनी सुरू ठेवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मोठमोठ्याने ध्वनिक्षेपक वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी रिसॉर्टवर गुन्हा दाखल करून ध्वनिक्षेपक जप्त करण्यात आला आहे. तसेच एकाला अटक केल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरही • शनिवारी रात्री उशिरापर्यंत पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे या किनारी भागात संगीत रजनी सुरू होत्या. याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या. परंतु त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

शनिवारी ज्या ठिकाणी रात्री १० वा. नंतर संगीत रजनी सुरू होत्या, त्यांच्या विरोधात ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीने पेडणे पोलिस, पेडणे
लाखो रुपयांच्या उलाढालीवर परिणाम रात्री दहापर्यंतच संगीत पार्यांना परवानगी असल्याने आता वेगवेगळ्या राज्यांमधून गोव्यात जावून नववर्ष स्वागताच्या पाटर्चा करण्यांचा हिरमोड होणार असल्याने कोट्यवधींच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.

उपजिल्हाधिकारी, स्थानिक आमदार यांना संदेश पाठवून त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. पेडणे पोलिसांनी मारबेला रिसॉर्टवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा पार्यांना स्थानिकांचा विरोध रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या संगीत रजनीविरोधात स्थानिक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांची दखल घेत उच्च न्यायालयाने रात्री दहानंतरच्या संगीत पायांवर बंदी घातली आहे.

 

Back to top button