मंचर : विनापरवाना फ्लेक्स; घोडेगावात तिघांवर गुन्हा | पुढारी

मंचर : विनापरवाना फ्लेक्स; घोडेगावात तिघांवर गुन्हा

मंचर; पुढारी वृत्तसेवा : विनापरवाना फ्लेक्स लावून मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झालाआहे. फिर्याद घोडेगावचे पोलिस जवान नामदेव ढेंगळे यांनी दिली. घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारोडी फाटा येथे रोडवर विनापरवाना फ्लेक्स लावल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना कळली होती.

पोलिसांनाही घटनास्थळी मोठा फ्लेक्स मोठा लावल्याचे दिसून आले. फ्लेक्स लावल्याप्रकरणी सनी देशमुख (वय 30, रा. सिन्नर, सध्या रा. जुन्नर फाटा, ता. आंबेगाव ), सुप्रीत हुले (रा. लांडेवाडी, पिंगळवाडी, ता. आंबेगाव ), दीपक सपके या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस जवान वाघ करीत आहेत.

इतरही बॅनरची तपासणी करणार
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतर बॅनरही परवानगी घेऊन लावले आहेत की नाही, हे तपासून गुन्हे दाखल करणार आहेत. नागरिकांनी विनापरवाना बॅनर लावू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

Back to top button