Indore Road Accident : इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, आठ ठार | पुढारी

Indore Road Accident : इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, आठ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा महामार्गावरील घाटबिल्लाडजवळ ही भीषण दुर्घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक उमाकांत चौधरी यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली. ( Indore Road Accident )

इंदूर-अहमदाबाद रोडवरील बेटमाजवळ रस्‍त्‍याच्‍या कडेला डंपर उभारला होता. मध्‍यरात्री उशीरा बोलेरोने रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, बोलेरोमधील ९ जणांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतामध्‍ये एका पोलीस हवालदाराचाही समावेश आहे. एका जखमीवर उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर डंपर चालक फरार

अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. आठ मृतदेह शवविच्‍छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Back to top button