पुणेकरांचं खोचक पण थेट बोलणे भावते….! : सुधा मूर्ती | पुढारी

पुणेकरांचं खोचक पण थेट बोलणे भावते....! : सुधा मूर्ती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  “पुणेरी लोकांना माझा विशेष नमस्कार. कारण पुणेकरांच्या थेट बोलणं अन् एन्जॉय करत जगणं मला खूप भावते. पाऊस कसा होता असं विचारल्यावर फक्त पुणेकरच म्हणू शकतात , काय सुंदर पाऊस होता. बाकी सर्व कंटाळा आणलाय पावसाने, म्हणत वायफळ चर्चा करतील. ” अशी मिश्किल चिमटा इन्फोसिस च्या सुधा मूर्ती यांनी पुण्यातील कार्यक्रमात काढला.
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये ‘ मूर्ती सेंटर फॉर इंडिक स्टडीज ‘ या नवीन संशोधन संस्थेच्या इमारत भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भांडारकर संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, महानगरपालिकेचे वाघमारे, संस्थेचे सचिव सुधीर वैश्यपायन, भूपाल पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. सुधा मूर्ती यांनी भाषणाच्या सुरवातीलाच पुणेकरांना हाथ जोडून त्यांच्या थेट बोलण्याच्या सवयीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, माझं आणि पुण्याचं एक घट्ट नातं आहे, हे मी माझं भाग्य समजते. मी पुण्याचीच आहे असं समजण्याच कारणही तसंच आहे. कारण मी एका शिक्षक कुटुंबातून आलेली आहे. माझं कुटुंब टिचिंग, नॉलेज अशा मोठ्या कार्यात होत. माझे आजोबा १०० वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेज विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते तर माझे वडील ससून मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. म्हणून माझं पुण्याशी विशेष नात आहे असं मी मानते.

पुण्यात शंभर वर्षे जुनी अशी ऐतिहासिक वारसा जतन करणारी भांडारकर सारखे संस्था आहे. इथे ऐतिहासिक वारसा जतन केला जात असला तरी त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. हे न होण्यामागचे कारण म्हणजे एक प्रकारे अडवांटेज पण आहे आणि दुसरं एडवांटेज पण आहे. एडवांटेज म्हणजे इथे प्रत्येक समजून घेऊन त्याचा अभ्यास करतो आणि डिसऍडवांटेज म्हणजे समजून घेत नाही आणि मदतही करत नाही असे मला वाटते. अशा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या विचारानेस माझ्या कुटुंबाकडून या केंद्रात नवीन स्टडी सेंटर व करण्याचे काम केले जात आहे.

आजच्या तरुण पिढीला आपली संस्कृती व इतिहास समजून घेण्यासाठी वाचन व अभ्यास करणे गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीला कालिदास आणि संस्कृत समजण्यापेक्षा शेक्सपियर समजून घेणे महत्त्वाचे वाटतं. पण शेक्सपियर आधी कालिदास व संस्कृत जन्माला आलेली असून तो ठेवा पुढे नेण्याचा काम आजच्या तरुणांना करणे गरजेचे आहे. संस्कृत भाषा तर ही मोठं ज्ञान भंडार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यामध्ये बहुरत्न असे आहेत की आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करतात असेही मूर्ती यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष भाषण करताना अभय फिरोदिया म्हणाले, सांस्कृतिक मूल्याचा ज्ञान जतन करण्याचे काम भांडारकर सारख्या संस्थेने केलेला आहे. आमच्या या कार्यात इन्फोसिसच्या माध्यमातून मोठे पाठबळ मिळाला आहे.

प्राकृत व संस्कृत एकाच अंगाच्या दोन बाजू आहेत. प्राकृत भाषा अगदी नगण्य आहे असं मान्य चुकीचा आहे असे मला वाटते. भारतीय भाषा मूल्यांचा उगम प्राकृत मध्ये झालेला आहे. सर्व मूल्य व परंपरेचा विचार करणे आजच्या काळाची गरज बनली आहे. दोन्ही भाषांमध्ये स्पर्धा नाही उलट दोघींचं कोल्याब्रेशन आहे असं मानलं तेव्हा प्राचीन विचारांचा आदर केल्यासारखं होईल असं मला वाटतं.

भांडारकर सारख्या जुन्या संस्थेला सरकार किंव्हा लोक मदत का करत नाही असा सुधा मूर्ती यांना प्रश्न पडला. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, सरकार विक्षिप्त असतं, सरकारला व्यवहारिक व सांस्कृतिक विचार कराव असे वाटत नाही. त्यांना समजत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करणे आता आम्ही सोडून दिलेला आहे. अशा मोठ्या कामात सरकारने विश्वासाने मदत केली तर संस्कृती वारसा पुढे नेण्याच्या कामात त्यांचाही हातभार लागू शकतो, मात्र ती मानसिकता असायला हवी असे वाटते.

भांडारकर नवनवीन प्रयोग करत असून आजच्या तरुण पिढीला संशोधन करणे कसं सहज सोपं होईल, यावर देखील प्रयत्न करत आहे. नव्याने तयार होणाऱ्या केंद्रांत संशोधक चांगले संशोधन करतील. त्यानंतर शंभर वर्षापूर्वी टाटा यांनी बांधलेल्या इमारतीत म्युझियम उभे केले जाईल असेही फिरोदिया यांनी यावेळी सांगितले.

तो आहेर होता… हा सन्मान….!

सुधा मूर्ती यांनी भूमिपूजनानंतर मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी सांगितले की, केली न साडी चोळी, आता काय गरज. त्यावर अभय फिरोदिया म्हणाले, तो आहेत होता हा सन्मान आहे. यानंतर जोरदार हशा पिकला.

Back to top button