Shraddha Walkar murder case : आफताबने खूनानंतर घेतली होती कुप्रसिद्ध खून खटल्‍यांसह सेलेब्रिटींच्‍या वर्तनाची माहिती | पुढारी

Shraddha Walkar murder case : आफताबने खूनानंतर घेतली होती कुप्रसिद्ध खून खटल्‍यांसह सेलेब्रिटींच्‍या वर्तनाची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लिव्ह-इन रिलेशनशिपमधील पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर आफताब पूनावालाने कुप्रसिद्ध खून खटल्यांची आणि कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्‍यानंतर सेलिब्रिटीचे वर्तन कसे होते, याची माहिती इंटरनेटच्‍या माध्‍यामातून  घेतली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ( Shraddha Walkar murder case )

या प्रकरणी ‘टाईम्‍स ऑफ इंडिया’ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, श्रद्धा वालकरची हत्या प्रकरणी सध्‍या आफताब पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्‍याची चौकशी केली असता त्‍याने अनेक बाबतीत खुलासा केला आहे. श्रद्धा वालकरची हत्या केल्‍यानंतर आफताबने इंटरनेटवर कोणत्‍या बाबी सर्च केल्‍या याची माहिती पोलिसांनी घेतली.

अटक झाल्‍यानंतर वर्तन कसे असावे…

खूनानंतर आफताब हा हॉलीवूडचा अभिनेता जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या घटस्फोट प्रकरणाची इंटरनेटच्‍या माध्‍यमातून माहिती घेत असे. आपण केलेले कृत्‍य उघड होवून अटक झाल्‍यानंतर आपलं वर्तन कसे असावे, यासाठी कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्‍यानंतर सेलिब्रिटी तणावाच्‍या काळात आपलं वर्तन कसे ठेवतात? याचीही माहिती त्याने घेतली होती. तसेच कुप्रसिद्ध खून खटल्याच्या  सुनावणीचीही त्याने माहिती घेतली होती, अशी माहिती पोलीस चोकशीत समोर आली आहे.

पॉलीग्राफ चाचणी दरम्यान आफताब शांतच होता

पॉलीग्राफ चाचणीच्‍या चौकशीदरम्‍यान आफताब शांतच होता. त्‍याच्‍या चेहर्‍यावर पश्चातापाचा लवलेशही नव्‍हता. पॉलीग्राफ चाचणीनंतर त्‍याने जेवण केले. दोन कैद्यांशी मित्रासारखा त्‍याने गप्पाही मारल्या. रात्री तो शांतपणे झोपलाही, अशी माहिती तिहार कारागृहातील सूत्रांनी दिली.

Shraddha Walkar murder case : मुंबईपर्यंत विमानाने केला प्रवास

या प्रकरणाचा तपास करणार्‍या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, आफताब सध्‍या शांत आहे. खूनानंतर त्‍याने आपल्‍या गुन्‍हा उघडकीस आल्‍यानंतर कसे वर्तन असावे याचा अभ्‍यास केला असावा. मात्र त्‍याने त्‍याच्‍या फोनवरुन काही इंटरनेटवर सर्च डिलीट केले होते. आफताबने श्रद्धाच्या फोनची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी मुंबईपर्यंत विमानाने प्रवास केला असावा, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button