जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको | पुढारी

जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
ओबीसी मोर्चातर्फे सुमारे १२ मुद्द्यांवर मंगळवारी (दि.29) आकाशवाणी चौकात महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रा. शिवाजीराव पाटील, प्रतिभा उबाळे, सुमित्र अहिरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये ओबीसी प्रवर्गास ५२ ट्क्के आरक्षण मिळावे. केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे. शेतकऱ्यांच्या मालाला न्युनतम निर्धारित मूल्य देण्यात यावे. कामगार विरोधी श्रम कायदा रद्द करण्यात यावा. ईव्हीएम मशिनद्वारे होणाऱ्या निवडणुका घेऊ नयेत. एनआरसी/ सीएए /एनपीआर कायदे रद्द करण्यात यावेत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आरक्षण क्रियान्वयक अधिनियम बनविण्यात  यावेत. एससी/ एसटी/ ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी अशा आदी मागण्या निवदेनाव्दारे करण्यात आल्या आहेत. रस्तारोको आंदोलनप्रसंगी राहुल सोनवणे, ॲड.गणेश सोनवणे, ॲड. कापडणे, मोहन शिंदे, अमजद रंगरेज, प्रमोद सौंदाणै पाटील, सुनिल देहडे, देवानंद निकम, डॉ.शाकीर शेख, संतोष जयकर, नितीन गाढे, निवृती पाटील, अबजल तडवी, अजित भालेराव आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

Back to top button