आठ महिन्यांत २० % नफा! ‘हा’ शेअर पोर्टफोलिओत हवाच! | पुढारी

आठ महिन्यांत २० % नफा! 'हा' शेअर पोर्टफोलिओत हवाच!

आठ महिन्यांत २० टक्के नफा मिळवून देणारा 'हा' शेअर पोर्टफोलिओत हवाच!

पुढारी ऑनलाईन – दैनिक पुढारीत दर सोमवारी अर्थभान ही अर्थविषय पुरवणी प्रसिद्ध होते. यामध्ये गुंतवणूक विषयक मार्गदर्शन केले जाते. डॉ. वसंत पटवर्धन त्यांच्या लेखात लक्ष्मीची पाऊले या लेखात ‘चकाकता हिरा’ या मथळ्याखाली या आठवड्यात गुंतवणूक योग्य अशा कंपनीची माहिती देतात. यावेळचा ‘चकाकता हिरा’ एशियन ब्राऊन बोव्हेरी म्हणून या कंपनीची निवड केली आहे.

ही कंपनी ऊर्जा क्षेत्रातील पायोनियर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. त्याचबरोबर विद्युत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीची कंपनी आहे. रेल्वेसाठी ती सुटे भाग पुरवते. झुरी (स्वित्झर्लंड)मध्ये तिचे प्रमुख कार्यालय आहे. 1988 मध्ये ती स्थापन झाली. जागतिक स्तरावर ती कार्यरत आहे. तिचे सुमारे 60000 कर्मचारी जगभर विद्युतीकरणाच्या क्षेत्रात सेवा पुरवतात.

या कंपनीच्या शेअरचा सध्याचा 3100 रुपयांच्या आसपास आहे. तो सात-आठ महिन्यांत 3650 रुपयांच्या आसपास जावा. म्हणजे सध्याच्या गुंतवणुकीवर 20 टक्के नफा मिळावा. या कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष मार्च 2021, 2022 व 2023 साठी अनुक्रमे 7197 कोटी रुपये, 8760 कोटी रुपये व 10,500 कोटींच्या आसपास होता/असेल. घसारा, कर व मुदती कर्जाचे हप्ते देण्यापूर्वीचे महसूल आर्थिक वर्ष मार्च 2021, 2022 व 2023 साठी अनुक्रमे 625 कोटी रुपये, 842 कोटी रुपये व 1250 कोटी रुपये होता/असेल. या कंपनीचे शेअरगणिक उपार्जन आर्थिक वर्ष मार्च 2021, 2022 व 2023 साठी अनुक्रमे 25 रुपये, 40 रुपये, 43 रुपये होते/असेल.
हा शेअर आपल्या भाग भांडारासाठी घेण्यास हरकत नाही.

(या पुरवणीत देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले, लेखक अभ्यास करून देत असतात. पण गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

हेही वाचा

Back to top button