धनत्रयोदशी विशेष : सोने खरेदी करताना घ्या ‘ही’ काळजी; टाळा मोठी फसवणूक – Tips for Gold Purchase during Diwali, dhanteras

Gold
Gold
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – दिवाळी हा भारतातील सर्वांत मोठा सण आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीची प्रथा आहे. पण सोने खरेदी करताना फसवणूक होण्याचाही मोठा धोका असतो. ही फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेतली तर भविष्यातील आर्थिक नुकसान टाळता येते. सोने खरेदी वेळी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.  (Tips for Gold Purchase during Diwali, dhanteras)

१. सर्टिफाईड सोनेच घ्या – सोने खरेदी करताना भारतीय मानक ब्युरो (BSI)ने प्रमाणित केलेले हॉलमार्क आहे का याची खात्री करून घ्या. सोन्याच्या शुद्धतेची हमी या हॉलमार्कमुळे मिळते.

२. किमतीची खात्री करा – सोने खरेदी करत असताना सोन्याच्या दरावर लक्ष ठेवा. सोन्याचे दर सतत बदलत असतात. एक्सचेंजवरील सोन्याचे दर आणि सोन्याचे कॅरट यावर ठरते. सोन्याचे दुकानात सांगितलेली किंमत ही नेहमी क्रॉस चेक करून घ्यावी, जेणे करून फसगत ठाळता येईल.

३. Making Charge (घडनावळ) किती? – दागिन्यांची किमतीती घडनावळीच्या दराचा समावेश असतो. घडनावळीचा दर जास्त असेल तर दागिना महाग पडू शकतो. त्यामुळे दागिने खरेदी करताना घडनावळीचा दर योग्य आकारला आहे, याची खातरजमा करा.

४. रोख खरेदी करावी का?– २ लाख आणि त्यापेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करताना पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. जर रोख स्वरूपात ही खरेदी असेल तर पॅन कार्ड द्यावा लागते. रोख सोने खरेदी करताना ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

५. विश्वासार्ह सराफकडूनच खरेदी करा – सोने खरेदी करताना तुमचा विश्वास असलेल्या सराफाकडूनच घ्या. तसेच सोन्याची पुन्हा विक्री करताना काय अटी आहेत, हेही पाहून घ्या. अनेक लोक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात, त्यामुळे परत विक्री करताना सोने खरेदीचे नियम काय आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

६. सोन्याला पर्याय काय? – सोने डिजिटल स्वरूपातही खरेदी करता येते. अगदी १ रुपयापासूनचे सोने डिजिटल प्रकारात घेता येते. डिजिटल सोने खरेदीची संपूर्ण महिती तुम्हाला या लिंकवर मिळेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news