बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी प्रयत्न : खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती | पुढारी

बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी प्रयत्न : खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

जळोची; पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या औद्योगिक, शैक्षणिक व कृषिक्षेत्रातील विकासाला आणखी चालना मिळण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल मन्युफॅक्चरर्स असोसिएशनने मुंबईसाठी थेट व रेल्वे सेवेबाबत रेल्वे मंत्रालयाशी बोलू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

बिमाचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, संभाजी माने, उद्योजक नितीन जामदार आदींच्या शिष्टमंडळाने यासंबंधी गुरुवारी सुळे यांची भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. बारामती परिसर कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात विकसित होत आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने बारामतीमध्ये दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत असतात.

Back to top button