सातारा : वाई शहरात दहा वाहनांच्या काचा फोडल्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

सातारा : वाई शहरात दहा वाहनांच्या काचा फोडल्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वाई ; पुढारी वृत्तसेवा : वाई शहरात रविवार पेठेत रामडोह आळी, ब्राम्हणशाही आदी ठिकाणी घराबाहेर लावलेल्या वाहनांची अज्ञात व्यक्‍तीकडून मोडतोड केल्याची बाब आज (मंगळवार) सकाळी निदर्शनास आली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार नेमका कोणी केला आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. वाई शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दहा वाहनांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.

वाई शहरात रविवार पेठेतल्या नागरिकांची वाहने रात्री घरासमोर लावलेली असतात. त्याच वाहनाच्या काचा फुटल्याचे सकाळी नागरिकांना दृष्टीस पडले. त्यात ओमीनी, स्विफ्ट, अल्टो अशा कारच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे नेमका कोणी हा प्रकार केला असावा, या परिसरात सीसीटीव्ही असून, त्यात हा प्रकार कैद झाला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. वाई शहरात यापूर्वी कधीही अशा प्रकारची घटना घडली नव्हती. दरम्‍यान मंगळवार रात्री अज्ञात व्यक्तीने फोडलेल्या वाहनांच्या काचांमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :  

Back to top button