सोलापूर : श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित | पुढारी

सोलापूर : श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सूक्षेत्र श्रीशैल येथे श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे द्वादश पीठारोहण व जन्म सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजित राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र विभागाचे स्वागत अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

शनिवारी (दि.१२) मुंबई येथे नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिष्टमंडळातील सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दि. १० ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलनच्या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दि.१० ते १५ जानेवारी या पाच दिवशी राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन, राष्ट्रीय वीरशैवागम समावेश, तेलगू, मराठी, कन्नड भाषा बंधुत्व कार्यक्रम, भक्तनिवास ,हॉस्पिटल महासभामंडप, वसती शाळा, संस्कृत गुरुकुल यांचे पायाभरणी कार्यक्रम, हिंदी, इंग्रजी, तेलुगु भाषेत अनुवादित केलेले सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध मान्यवर येणार असल्याची माहिती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button