Himachal Pradesh Election : हिमाचल प्रदेशमधील मतदान प्रक्रिया समाप्त; ६५.९५ टक्के मतदान
पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशच्या ६८ विधानसभा जागेसाठीची मतदान प्रक्रिया शनिवारी (दि. १२) पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६५.९५ टक्के मतदान झाले आहे. सर्व मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. यासाठी ७८८१ मतदान केंद्र नियोजित करण्यात आले होते. (Himachal Pradesh Election)
कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती मतदान ?
सर्वाधिक मतदान हे सिरमौर जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी लाहौल स्फिती जिल्ह्यात मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सिरमौरमध्ये ७२.३५ %, विलासपूर येथे ६५.७२ टक्के, हमीरपूर येथे ६४.७४%, कांगडा येथे ६३.९५%, मंडी येथे ६६.७५%, शिमला येथे ६५.६६%, सोलन येथे ६७.६७% इतके मतदान झाले. (Himachal Pradesh Election)
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतील मतदान
विलासपूर मध्ये ७६.५४ %, चम्बा मध्ये ७४.१०%, हमीरपूर मध्ये ७०.६४ %, कांगडा मध्ये ७२.९७%, किन्नौर मध्ये ७५.५१%, कुल्लू मध्ये ७८.८८%, लाहौल स्पीती मध्ये ७३.१७%, मंडी मध्ये ७६.३५%, शिमला मध्ये ७३.४३%, सिरमौर मध्ये ८१.५१%, सोलनमध्ये ७८.१०%, ऊना मध्ये ७६.८२% इतके मतदान झाले होते.
शनिवारी मतदान प्रक्रिया संपली तरीही मतदानासाठी अजूनही लांब रांगा पहायला मिळाल्या. ही मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. येत्या काही दिवसांतच निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४१२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये २४ महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा
- Sachin Tendulkar On Indian Team : सेमीफायनल मधील पराभवानंतर सचिन तेंडूकरने दिली 'अशी' प्रतिक्रीया
- T20 WC 2022 : जोस बटलरकडून सूर्यकुमारचे कौतुक; म्हणाला, 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'
- दिल्लीत ४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्र 'भागीदार राज्य'!
- Gosikhurd Project : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला गोसे धरणाचा आढावा

