स्टीव्ह जॉब्सच्या सँडलचा लिलाव, बोली ऐकून उडेल ‘होश’ | पुढारी

स्टीव्ह जॉब्सच्या सँडलचा लिलाव, बोली ऐकून उडेल 'होश'

पुढारी ऑनलाईन : ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. लोकांची त्याच्याबद्दल आणि त्‍यांच्या वस्‍तूबद्‌दल क्रेझ आहे. तसेच लोक त्याच्या वस्तूही खरेदी करू इच्छितात. स्टीव्ह जॉब्स यांच्या अनेक वस्तूंचा लिलाव महागडा असतो. मग तो त्यांच्या नोकरीसाठी दिलेला अर्ज असो किंवा त्यांनी वापरलेला संगणक असो.

ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 1970 मध्ये पहिल्यांदा परिधान केलेली ‘तपकिरी लेदर बर्कनस्टॉक ऍरिझोना सँडल’चा लिलाव होणार आहे. याची किमान बोली रु. 48 लाख 32 हजार 889 ते 64 लाख 43 हजार 852 पासून सुरू होईल, असे लिलावकर्ता ज्युलियन्स ऑक्शन्सने सांगितले आहे.

दरम्‍यान, या सँडलसह लिलावात सँडलचा NFT फोटो तसेच छायाचित्रकार जीन पिगोझी यांचे पुस्तक देखील मिळणार आहे. ‘द 213 मोस्ट इम्पॉर्टंट मेन इन माय लाइफ’ असे या पुस्तकाचे नाव असून त्यामध्ये मिस्टर जॉब्स ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहेत.

11 -13 नोव्हेंबर रोजी थेट लिलाव 

स्टीव्ह जॉब्स यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात ही सँडल घातली होती. स्टीव्ह जॉब्सचे गृह व्यवस्थापक, मार्क शेफ यांच्याकडे पूर्वी बर्कनस्टॉक सँडलची ही जोडी होती. ऍपलच्या इतिहासात स्टीव्ह जॉब्स यांनी हे सँडल परिधान केले होते, असे लिलावगृहाचे म्हणणे आहे.

स्टीव्ह जॉब्स यांचे हे सँडल 2017 मध्ये इटलीतील मिलानमधील सलोन डेल मोबाइल, 2017 मध्ये जर्मनीतील रेहम्समधील बर्कनस्टॉक मुख्यालय, न्यूयॉर्कमधील SoHo येथील कंपनीची पहिली यूएस साइट, कोलोन, जर्मनीमधील IMM कोलोन फर्निचर फेअर यासह अनेक प्रदर्शनांमध्ये होते.

हेही वाचा 

जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप 

नाशिक : ८७ वर्षीय वृद्धाने कॅन्सरला हरवले, तीन तास सुरु होती शस्रक्रिया 

हिंगोली : राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडन येथील डॉक्टर कुटुंबासह भारत जोडो यात्रेत सहभागी 

 

Back to top button