UP Girl Kidnapped : अपहरण करुन अल्पवयीन मुलीवरअत्याचार | पुढारी

UP Girl Kidnapped : अपहरण करुन अल्पवयीन मुलीवरअत्याचार

बलिया; पुढारी ऑनलाईन : चार महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बलिया येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. बिहारमधील भागलपूर येथून पीडितेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास न्यायलयीन कोठडीत पाठवले आहे. यावेळी आरोपीने पीडितेचे अपहरण करुन तिच्या अत्याचार केला. पीडितेच्या जबाबानंतर तिला कुटुंबियांकडे सोपविण्यात आले. (UP Girl Kidnapped)

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दुर्गा प्रसाद तिवारी यांनी सांगितले, अमित राय नावाच्या १९ वर्षांच्या तरुणाने मुलीचे अपहरण केले होते. या प्रकरणी २८ जुलै मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपी आणि पीडितेला भागलपूर येथून ताब्यात घेण्यात आले. यावेळी पीडितेने सांगितले की, आरोपीने जबरदस्ती माझे अपहरण केले आणि माझ्यावर अत्याचार केला. (UP Girl Kidnapped)

आरोपीस सुनावली न्यायालयीन कोठडी (UP Girl Kidnapped)

यावेळी तिवारी यांनी सांगितले, पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले आहे. आमच्या टीमने रविवारी पीडितमुलीला यशस्वीरीत्या शोधले, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर तिने मॅजिस्ट्रेट समोर आपला जबाब नोंदवला. तसेच आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.


अधिक वाचा :

Back to top button