Danushka Gunathilaka | बलात्कार प्रकरणी अटकेनंतर दनुष्का गुनाथिलका श्रीलंका क्रिकेटकडून निलंबित | पुढारी

Danushka Gunathilaka | बलात्कार प्रकरणी अटकेनंतर दनुष्का गुनाथिलका श्रीलंका क्रिकेटकडून निलंबित

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुनाथिलका (Danushka Gunathilaka) अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने दनुष्का गुनाथिलका याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघातील निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाल्यानंतर दनुष्का गुनाथिलका (Danushka Gunathilaka) याला सिडनीत अटक केली आहे.

श्रीलंका संघातील खेळाडू दनुष्का गुनाथिलका याला सामना झाल्‍यानंतर सिडनी पाोलिसांनी अटक केली. २ नाोव्‍हेंबर रोजी एका महिलेवर बलात्‍कार केल्‍याचा त्‍याच्‍यावर आरोप आहे. गुनाथिलका विनाच श्रीलंकेचा संघ मायदेशासाठी रवाना झाला. गुनाथिलका याने नामिबिया विरुद्धचा सामना खेळला होता. या सामन्यात तो शून्‍य धावांवर बाद झाला होता. यानंतर जखमी असल्‍याने तो पुढील सामन्‍यात खेळू शकला नाही.

Danushka Gunathilaka : काय आहे आरोप?

या प्रकरणी न्‍यू साउथ वेल्‍स पोलिसांनी आपल्‍या वेबसाइईटवर दिलेल्‍या माहितीमध्‍ये म्‍हटलं आहे की, सिडनीमधील एका २९ वर्षीय महिलेने बलात्‍काराची तक्रार दाखल केली. पीडितेच्‍या घरीच आरोपीने अत्‍याचार केला. याप्रकरणी आम्‍ही श्रीलंकेतील एका व्‍यक्‍तीला अटक केली आहे. ऑनलाईन डेटिंग ॲपच्‍या माध्‍यमातून पीडित महिला आणि श्रीलंकेतील तरुण यांची ओळख झाली. दोघेही मागील काही दिवस फोनवर बोलत होते. २ नोव्‍हेंबर रोजी हा तरुण महिलेला भेटला. यावेळी त्‍याने बलात्‍कार केल्‍याचा आरोप पीडितीने केला आहे. या प्रकरणी श्रीलंकेतील ३१ वर्षीय व्‍यक्‍तीला ससेक्‍स स्‍ट्रीटवरील एका हॅाटेलमध्‍ये रात्री १ वाजता अटक केली. याप्रकरणी श्रीलंका क्रिकेट व्‍यवस्‍थापन समितीकडून अद्‍याप खुलासा करण्‍यात आलेला नाही.

हे ही वाचा :

Back to top button