पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणार्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी ( दि. ५) श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात उतरला. या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करत या संघाला स्पर्धेतून बाद केले. ( Danushka gunathilaka ) मात्र हा सामना झाल्यानंतर असे काही घडलं की संपूर्ण संघाला माोठा धक्का बसला.
श्रीलंका संघातील खेळाडू धनुष्का गुनाथिलका याला सामना झाल्यानंतर सिडनी पाोलिसांनी अटक केली. २ नाोव्हेंबर रोजी एका महिलेवर
बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.गुणथलिका विनाच श्रीलंकेचा संघ मायदेशासाठी रवाना झाला. नाथिलका याने नामिबिया विरुद्धचा सामना खेळला होता. या सामन्यात तो शून्य धावांवर बाद झाला होता.यानंतर जखमी असल्याने तो पुढील सामन्यात खेळू शकला नाही.
या प्रकरणी न्यू साउथ वेल्स पोलिसांनी आपल्या वेबसाइईटवर दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की, सिडनीमधील एका २९ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेच्या घरीच आरोपीने अत्याचार केला. याप्रकरणी आम्ही श्रीलंकेतील एका व्यक्तीला अटक केली आहे. ऑनलाईन डेटिंग ॲपच्या माध्यमातून पीडित महिला आणि श्रीलंकेतील तरुण यांची ओळख झाली. दोघेही मागील काही दिवस फोनवर बोलत होते. २ नोव्हेंबर रोजी हा तरुण महिलेला भेटला. यावेळी त्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडितीने केला आहे. या प्रकरणी श्रीलंकेतील ३१ वर्षीय व्यक्तीला ससेक्स स्ट्रीटवरील एका हॅाटेलमध्ये रात्री १ वाजता अटक केली. याप्रकरणी श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापन समितीकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
हेही वाचा :