सभेसाठी श्रोते, साहित्य कमी पडले तर देईन; मंत्री सत्तार यांचा आदित्य ठाकरेंना टोला | पुढारी

सभेसाठी श्रोते, साहित्य कमी पडले तर देईन; मंत्री सत्तार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : एखादे वेळेस सिल्‍लोड येथे होणार्‍या सभेला श्रोते कमी पडत असतील तर ते पुरवीन, इतरही साहित्य लागत असेल तर तेही देईन. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी रणछोडदास होऊ नये, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.
पंढरपूर येथून परत जात असताना मंत्री सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की सोमवारी (दि. ७) खा. श्रीकांत शिंदे यांची सिल्‍लोड येथे सभा होत आहे. या सभेसाठी शिंदे यांना स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. असे असताना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभेसाठी त्याच मैदानाची मागणी शुक्रवारी (दि.४) केली आहे. त्यामुळे पोलीस व नगरपालिकेने त्यांना इतर कोणत्याही मैदानाची मागणी करण्याबाबतचे पत्र दिले आहे.

केवळ खा. शिंदेंच्या सभेला घाबरुन आ. ठाकरे हे पळ काढत आहेत. पोलिस व पालिकेची बदनामी करीत आहेत. त्यांनी असे रणछोडदास होऊ नये. हवे तर त्यांना सभेसाठी माणसं (श्रोते) मी पुरवितो. स्टेज, खुर्च्या किंवा इतर काही साहित्य कमी पडत असेल तर तेही पुरवितो. पण सिल्‍लोडमध्ये या दोन्ही नेत्यांची सभा व्हावी. आ. ठाकरे यांनी पळ काढू नये, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.

मी इतका सोपा नाही…!

सत्तार म्हणाले, ठाकरे कुटंबीय मी सोप आहे असे समतज आहेत. प्रत्यक्षात मी इतका सोपा नाही. माझ्या मागे माझे मतदार खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे स्वत: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवावी.

हेही वाचलंत का?

Back to top button