श्रीरामपुरात पालिका, पोलिसांकडून अतिक्रमण करणाऱ्यांना ‘ऑनलाईन झटका’ | पुढारी

श्रीरामपुरात पालिका, पोलिसांकडून अतिक्रमण करणाऱ्यांना 'ऑनलाईन झटका'

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : नगर पालिका व शहर पोलिस ठाण्याच्या संयुक्त मोहिमते शहरातील दुकानांसमोरील शेडसह सुमारे 40 बोर्ड, 50 हातगाड्या, रस्त्यावर लावलेल्या 30 दुचाकी चालकांना 500 ते 1 हजारापर्यंत ऑनलाईन दंड करण्यात आल्याने या कारवाईची दिवसभर चर्चा सुरु होती. दरम्यान, कारवाईची ही मोहीम दररोज हाती घेणार असल्याचे शहर पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले. या धडक कारवाईत नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पो. नि. हर्षवर्धन गवळींसह स. पो. नि. पाटील, पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश होता.

शहरात गेल्या काही दिवसांपासून बेशिस्तपणे रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या दुचाकी, हातगाड्या, काही दुकानांसमोरील मंडप व फलक या मोहीमेत काढण्यात आले. आता कारवाई दैनंदिन करण्यात येणार असल्याचे पालिका व पोलिसांनी सांगितले.

 

शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर आडव्या लावण्यात येणार्‍या दुचाकींसह, दुकानांसमोरील नियमबाह्य मंडप, फलक हटाओ मोहीम केवळ एक दिवसाची मोहीम नसून, यापुढे दररोज ही कारवाई करण्यात येणार आहे. नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी स्वतःच नियम पाळावेत.
                                              – गणेश शिंदे, मुख्याधिकारी, नगर पालिका

Back to top button