एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून अडीच तास चौकशी | पुढारी

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून अडीच तास चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून अडीच तास चौकशी करण्यात आली. दादर पोलिस ठाण्यात आज दुसऱ्यांदा त्यांची चौकशी करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप करत कथित पुरावे दिले होते.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच त्यांच्या चौकशीची मागणीही केली होती. त्यानुसार पेडणेकर यांना पोलिसांनी समन्स बजावल होते. या चौकशीसाठी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे त्यांची सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली.  चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोप एका पक्षाच्या वरीष्ठ नेत्याने केला आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहीजे असे नाही. पोलिसांनी जे प्रश्न विचारले त्याची मला माहीत असलेली उत्तरे दिली आहेत. मी कायद्याची लढाई लढत आहे. आरोपामध्ये १० टक्केही सत्य नाही. साप समजून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा  :

Back to top button