‘आप’च्या नेत्याला १० कोटी दिले; जॅकलीनचा बॉयफ्रेंड महाठग सुकेशचा आरोप

‘आप’च्या नेत्याला १० कोटी दिले; जॅकलीनचा बॉयफ्रेंड महाठग सुकेशचा आरोप
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :आप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना 'प्रोटेक्शन मनी' म्हणून १० कोटी रुपये दिल्याचा दावा घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील सुकेशने सक्सेना यांच्याकडे केली आहे. मागील काही वर्षांपासून सुकेश तुरुंगात बंद आहे, तुरुंगातूनच त्याने उपराज्यपाल सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. सत्येंद्र जैन यांनी वारंवार पैसे देण्यासाठी मला भाग पाडले, असे सांगून सुकेश पत्रात पुढे म्हणतो की, केवळ दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सुकेशने १० कोटी रुपये माझ्याकडून वसूल केले. कोलकाता येथील जैन यांचे निकटवर्तीय चतुर्वेदी याच्यामार्फत हा पैसा वसूल करण्यात आला.

गेल्या ३ वर्षांपासून सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात बंद आहेत. मात्र, त्यांनी तुरुंग खात्याच्या महासंचालकामार्फत मला धमकावले. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला. मला धमकी देण्यात आली, असेही सुकेशने पत्रात नमूद केले आहे. २०१७ साली मला अटक करण्यात आली होती. जैन त्यावेळी तुरुंग खात्याचे मंत्री होते. कित्येकदा तुरुंगात येऊन त्यांनी पैसे दिल्याचे कोणाला सांगू नको, अशा शब्दांत धमकावले होते, असा दावाही सुकेशने केला आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news