Movie Release : खुशखबर; नोव्हेंबरमध्ये तब्बल २३ चित्रपट पडद्यावर | पुढारी

Movie Release : खुशखबर; नोव्हेंबरमध्ये तब्बल २३ चित्रपट पडद्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा ‘थॅंक गॉड’ आणि अभिनेता अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन पहिल्याच आठवड्यात दोन्ही चित्रपटांनी फ्लॉपच्या दिशेने वाटचाल केली. या दोन्ही चित्रपटातील काहींना सीन आवडले नाहीत तर काहींना डॉयलॉग पसंत पडले नाहीत. याच दरम्यान सिनेप्रेमींसाठी आणखी एक खुशखबर असून येत्या नोव्हेंबर महिन्यात एक-दोन नाही तर तब्बल २३ चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. याच हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी अशा विविध भाषेतील चित्रपटात हॉरर, कॉमेडीसोबत रोमान्स आणि अॅक्शनचा तडका अनुभवायाला मिळणार आहे. यामुळे कोणकोणते तुमच्या आवडीचे चित्रपट पाहायला मिळणार हे पाहूयात… (Movie Release)

मराठी चित्रपट

मराठी रसिकांसाठी नोंव्हेबर महिना खूपच खास आहे, कारण या महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकूण पाच चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या आठवड्यात म्हणजे, येत्या ४ नोव्हेंबरला ‘मन कस्तुरी रे’, ‘प्रेम प्रथा धुमशान’, ‘३६ गुण’, ‘प्रेम म्हणजे काय असतं’ आणि ‘पल्याड’ हे मराठी चित्रपट चाहत्याच्या भेटीस सज्ज झाले आहेत.

प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे काय असतं?

हिंदी चित्रपट

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिंदीत एक-दोन नाही तर तब्बल सहा चित्रपट रिलीज होणार आहे. एकूण सहा चित्रपट ही एक सिनेरसिकांसाठी मेजवानीच आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा आगामी हॉरर कॉमेडी ‘फोन भूत’, बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांचा आगामी ‘डबल एक्सएल’ हे दोन्ही चित्रपट येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दस्तक देणार आहेत. यामुळे कॅटरिना कैफला सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट टक्कर देणार आहेत. यासोबत येत्या ४ नोव्हेंबरला बॉलिवूड अभिनेत्री जाहन्वी कपूरचा आगामी ‘मिली’, ‘कुत्ते’, ‘धूप छांव’ आणि ‘रामराज्य’ हे चित्रपटदेखील रिलीज होणार आहे.

तेलुगू चित्रपट

बॉलिवूडसोबत तेलगूमध्येही सिने रसिकांचा एक- दोन नाही तर सहा चित्रपटाची लॉटरी लागली आहे. यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे, ४ नोंव्हेंबरला ‘उर्वसिवो रक्षासिवो’, ‘मिस्टर तारक’, ‘सराधी’, ‘अकाश्म’, ‘लाइक, शेयर अॅन्ड सब्सक्राइब’ आणि ‘जेट्टी’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत.

LIKE SHARE AND SUBSCRIBE MOVIE | Official Trailer | Like Share And Subscribe Movie Trailer Telugu - YouTube

कन्नड चित्रपट

मराठी, हिंदीसह कन्नडमध्येही काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. या चित्रपटातून धमाकेदार अॅक्शनसोबत रोमॅन्टिक अंदाज चाहत्याचा भेटीस येत आहेत. यात पहिला ‘बनारस’ आणि दुसरा ‘कांबलीहुला’ हे आहेत. ( Movie Release )

Banaras (2022) | Banaras Kannada Movie | Banaras Cast & Crew, Story, Release Date, Review, Photos, Videos – Filmibeat

मल्ल्याळम चित्रपट

येत्या नोंव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात मल्ल्याळम चित्रपटसृष्टीतील रसिकांसाठी नवीन चार चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाले आहेत. यात ‘सॅटरडे नाइट’, ‘कूमॅन’ आणि ‘एलम सेट्टनु’ हे चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलिज होणार आहेत.

Saturday Night (2022) | Saturday Night Malayalam Movie | Saturday Night Cast & Crew, Story, Release Date, Review, Photos, Videos – Filmibeat

पंजाबी चित्रपट

या आठवड्यात पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील काही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता एमी विर्क याच्या मुख्य भूमिका असमारा ‘ओए मखना’ हा रोमँटिक- कॉमेडी चित्रपट रिलीज होत आहे. यासर्व हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, पंजाबी चित्रपटातून धमाकेदार अॅक्शन सीन चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातून रसिकासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या चित्रपटाची लॉटरीच जणू लागली आहे.

Phone Bhoot: Katrina Kaif returns in new look with magical powers. See pic | Bollywood - Hindustan Times

हेही वाचलंत का? 

Double XL Teaser: Sonakshi Sinha, Huma Qureshi to Shatter Fat-Shaming in Mudassar Aziz Directorial (Watch Video) | LatestLY

Back to top button