

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १६ चा नवा प्रोमो जारी केलं आहे. यामध्ये अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि सलमान खान खूप मस्ती करताना दिसत आहेत. (Bigg Boss १६) दोघे 'टिप-टिप बरसा पाणी'वरदेखील डान्स करताना दिसत आहेत. बिग बॉस १६ च्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. यावेळी सलमान खान आणि कॅटरिना कैफ खूप धमाल करत आहेत. (Bigg Boss १६)
'फोन भूत' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ बिग बॉस १६ मध्ये हजेरी लावली. वास्तविक कॅटरिना कैफ बिग बॉस १६ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. या चित्रपटात त्याच्याशिवाय या दोघांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कॅटरिना कैफ सलमान खानसोबत एक गेम खेळते आणि त्याला विचारते की, त्याने कधी पावसात भिजत गाण्यावर डान्स केला आहे का?
यावर सलमान खान म्हणतो, 'यापूर्वी जुन्या चित्रपटांमध्ये पावसात सर्व ॲक्शन सीन आणि गाणी शूट केली जात होती. आता तिला तिच्यासोबत 'टीप टिप बरसा पानी' या गाण्यावर डान्स करावा लागणार असल्याचेही तो म्हणतो. त्यानंतर दोघेही टीप टीप बरसा पाणीवर डान्स करु लागतात.
कॅटरिना कैफ आणि सलमानच्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. त्याला ३ तासात ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सलमान खानही गाणे गाताना दिसत आहे. कॅटरिना कैफची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. त्याचवेळी तो कॅटरिना कैफसोबत भूत चित्रपटातील गाण्यावर डान्सही करतो. सलमान खानला नुकतेच डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते आणि आता तो बरा झाला असून तो बिग बॉस १६ मध्ये परतला आहे.
हेही वाचा :