बलात्कार पीडित महिलांची ‘टू फिंगर’ चाचणी केल्यास कारवाई करा: सर्वोच्च न्यायालय | पुढारी

बलात्कार पीडित महिलांची 'टू फिंगर' चाचणी केल्यास कारवाई करा: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बलात्कार पीडित महिलांची ‘टू फिंगर’ चाचणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. ‘टू फिंगर’ चाचणी ही अशास्त्रीय असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार स्पष्ट केलेले आहे.

बलात्कार पीडित महिलेला आधीच धक्का बसलेला असतो. त्यात ‘टू फिंगर’ चाचणीमुळे तिला दुसरा धक्का बसू शकतो, अशी टिप्पणी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान केली. या चाचणीचा संदर्भ अभ्यासक्रमातून वगळण्याचे निर्देशदेखील न्यायालयाने दिले आहेत. एखादी महिला लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहे, याचा अर्थ तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे नाही, असा शेरा न्यायालयाने मारला.

टू फिंगर पध्दतीमागे पितृसत्ताक मानसिकता दिसून येते. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ही पध्दत वापरली जाऊ नये, असे आम्ही वारंवार सांगितलेले आहे. असे असूनही जर कोणी टू फिंगर पध्दतीचा अवलंब करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button