मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार | पुढारी

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास उंबरमाळी येथे दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. जयराम सोमनाथ बांबळे (वय ८ रा. उबरमाळी), बबन साबळे (वय 35, रा. अकोले, पाडोशी), मस्तान (पूर्ण नाव माहिती नाही) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात नीलकंठ मुत्ते, दत्ता हिले हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य ,महामार्ग पोलीस शहापूर केंद्र चे कर्मचारी,कसारा पोलीस घटनास्थली दाखल झाले आहेत. दरम्यान जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने खर्डी ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button