Mathew Wade : ऑस्ट्रेलियाचा पाय खोलात ; झम्पापाठोपाठ आणखी एक खेळाडू कोरोनाच्‍या विळख्‍यात | पुढारी

Mathew Wade : ऑस्ट्रेलियाचा पाय खोलात ; झम्पापाठोपाठ आणखी एक खेळाडू कोरोनाच्‍या विळख्‍यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकातील गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. ॲडम झम्पाला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडलाही (Mathew Wade) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संघाकडे कोणताही बॅकअप यष्टिरक्षक फलंदाज नसल्याने पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नियम काय सांगतो?

‘आयसीसी’ने कोरोनाबाधित खेळाडूंनाही खेळण्याची परवानगी दिली आहे. मात्र, संघाच्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतरच कोरोनाबाधीत खेळाडू सामन्यात खेळू शकतो. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनानेही तो पुढील सामन्यात खेळू शकेल, अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र, वेडला खेळण्याची संधी न मिळाल्यास डेव्हिड वॉर्नर, ॲरॉन फिंच किंवा ग्लेन मॅक्सवेल या तिघांपैकी एकाला विकेटकीपर (यष्‍टीरक्षक) म्‍हणून जबाबदारी पार पाडावी लागले.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना २८ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. (Mathew Wade) cricket.com नुसार, वेडला कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत त्यामुळे तो पुढील सामन्यात खेळू शकतो. ३४ वर्षीय वेड व्यतिरिक्त जोश इंग्लिसचीही संघात निवड करण्यात आली होती. मात्र, दुखापतीमुळे तो संघातून बाहेर पडला. त्याच्या जागी अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचा संघात समावेश करण्यात आला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या नेट सत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेट सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेल विकेटकीपरचे प्रशिक्षण घेताना दिसला होता. त्याच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक आंद्रे बोरोविच यांच्यासोबत सराव करताना दिसले.

हेही वाचा;

Back to top button