Virat Kohli : विराट स्वत:च्याच शॉटने हैरान, किंग कोहलीची गोल्डन रिॲक्शन व्हायरल (Video) | पुढारी

Virat Kohli : विराट स्वत:च्याच शॉटने हैरान, किंग कोहलीची गोल्डन रिॲक्शन व्हायरल (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : virat kohli golden reaction : भारताने टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना भारतीय संघाने रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 2 बाद 179 धावा केल्या. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावू केवळ 123 धावा करू शकला.

दरम्यान, आजच्या सामन्यात रन मशीन विराट कोहलीने (virat kohli) सिडनी क्रिकेट मैदानावर नेदरलँड्सविरुद्ध धमाकेदार खेळी केली. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात 62 धावांच्या नाबाद खेळीदरम्यान त्याने 44 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. या अर्धशतकी खेळीत विराटने एकापेक्षा-एक जबरदस्त फटके मारले. यात त्याने एक असा शॉट खेळला ज्यावर खुद्द कोहलीलाही विश्वास बसत नव्हता. शॉट खेळल्यानंतर त्याची रिॲक्शन पाहण्यासारखी होती. विराटने 17 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा शॉट खेळला. त्यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 2 बाद 135 धावा होती.

कोहली 35 चेंडूत 43 आणि सूर्यकुमार यादव 12 चेंडूत 26 धावांवर खेळत होता. विराटने वेगवान गोलंदाज फ्रेड क्लासेन याने फेकलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकावला. हा शॉट खेळल्यानंतर कोहलीही (virat kohli) त्या चेंडूकडे पाहत राहिला. त्याची ही गोल्डन रिॲक्शन पाहण्यासारखी होती. या एकदरीत संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आयसीसीने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, ” What a strike” असे म्हणत कोहलीच्या शॉटचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)


कोहली (virat kohli) आणि सूर्यकुमार (suryakumar yadav) यांनी सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 48 चेंडूत 95 धावांची नाबाद भागीदारी केली. कोहलीशिवाय सूर्यकुमारने केवळ 25 चेंडूत 204.00 च्या स्ट्राईक रेटने 51 धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारून भारताला 2 विकेट्सवर 179 धावांपर्यंत पोहोचवले.

Back to top button