Rohit Sharma Record T20WC : ‘हिटमॅन’ने सिक्सर किंग युवराजला टाकले मागे | पुढारी

Rohit Sharma Record T20WC : ‘हिटमॅन’ने सिक्सर किंग युवराजला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record T20WC : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आज (दि.27) नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नवी उंची गाठली आहे. रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला आणि उपकर्णधार केएल राहुल लवकर बाद झाला. मात्र यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला आणि संघाची धावसंख्या पुढे नेण्याचे काम केले. पहिल्या धक्क्यातून सावरलेल्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहवचण्याचे काम केले. यादरम्यान रोहितही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचे सिक्सर किंग युवराज सिंगला मागे टाकले.

आयसीसी टी20 (ICC T20) वर्ल्ड कपच्या इतिहासात ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे ज्याने 50 हून अधिक षटकार ठोकले आहेत. या यादीत 63 षटकारांसह गेल अव्वल असून आता रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्माने नेदरलँडविरुद्ध तिसरा षटकार मारताच त्याने युवराज सिंगला मागे टाकले. रोहितने 39 चेंडूत 53 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार फटकावले. (Rohit Sharma Record T20WC)

टी 20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर रोहित सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलपेक्षा खूप मागे आहे, पण हा विक्रम मोडण्याची ताकद त्याच्यात नक्कीच आहे. या सामन्यासह रोहित फॉर्ममध्ये परतला असल्याचे चित्र आहे. टीम इंडियाच्या पुढील सामन्यांसाठी त्याचा खूप महत्त्वाचा आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत युवराज सिंग तिसऱ्या तर शेन वॉटसन चौथ्या क्रमांकावर आहे. युवीने 33 तर वॉटसनने 31 षटकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नरनेही 31 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सच्या खात्यात 30 षटकार आहेत. (Rohit Sharma Record T20WC)

 

Back to top button