‘आप निर्भरता‘ हवी की ‘आत्मनिर्भरता‘ हे दिल्लीच्या जनतेने ठरवावे : अमित शहा | पुढारी

‘आप निर्भरता‘ हवी की ‘आत्मनिर्भरता‘ हे दिल्लीच्या जनतेने ठरवावे : अमित शहा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – आम आदमी पक्षावर अवलंबून असलेली ‘आप निर्भरता‘ हवी की प्रत्येक बाबतीत ‘आत्मनिर्भरता‘ हे दिल्लीकर जनतेने आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठरवावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ( दि. २०) केले. ‘वेस्ट टू एनर्जी‘ प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी शहा म्हणाले, ” केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीकरांना ‘आप निर्भर‘ करु पाहत आहे तर भाजप दिल्लीला आत्मनिर्भर करु पाहत आहे, दिल्लीतील पूर्वाश्रमीच्या तीन महापालिकांसोबत आप सरकारने दुजाभाव केला होता. या महापालिकांचे 40 हजार कोटी रुपये देणे केजरीवाल सरकारने अडविले होते. महापालिकांबाबत अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे वागले होते, त्याचे उत्तर आम्ही महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे देऊ. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पामुळे दिल्लीत तयार झालेले कचऱ्याचे मोठमोठे डोंगर नष्ट होतील.”

हेही वाचा : 

 

Back to top button