India Tour of Bangladesh : टीम इंडियाच्या बांगलादेश दौ-याची घोषणा! जाणून घ्या शेड्यूल | पुढारी

India Tour of Bangladesh : टीम इंडियाच्या बांगलादेश दौ-याची घोषणा! जाणून घ्या शेड्यूल

पुढारी ऑनलाईन डेस्क : India Tour of Bangladesh : भारतीय संघ सध्या टी 20 विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. या जागतिक स्पर्धेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर तीन टी-20 सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भाग घेणार आहे. तर त्यानंतर डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) गुरुवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली तसेच दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर केले. (India tour of Bangladesh 2022 Schedule Announced)

भारतीय संघ सात वर्षांनंतर बांगलादेशचा दौ-यावर जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस सुरू होणा-या बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघ 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी तीन एकदिवसीय सामने, तर 14 ते 18 डिसेंबर आणि 22 ते 26 डिसेंबर दरम्यान दोन कसोटी सामने खेळणार आहे. 2015 नंतर भारताचा बांगलादेशचा हा पहिला पूर्ण दौरा असेल. त्या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. तर बांगलादेशने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती. (India tour of Bangladesh 2022 Schedule Announced)

भारत vs बांगलादेश हेड टू हेड…

भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आतापर्यंत 36 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 30 तर बांगलादेशने 5 विजय मिळवले आहेत. अशा स्थितीत भारताचे पारडे जड जाणार आहे. यासह, दोन्ही देश कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये भारताने 9 सामने जिंकले आहेत तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. (India tour of Bangladesh 2022 Schedule Announced)

या दौऱ्याबद्दल बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष नझमुल हसन म्हणाले, ‘सध्याच्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील रोमांचक सामने झाले आहे. वर्ष अखेरीस भारताचा संघ बांगलादेश दौ-यावर येणार असून तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या अविस्मरणीय मालिकांसाठी उत्सुक आहेत. मी बीसीबीसह भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे आभार मानतो. टीम इंडियावे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे म्हटले आहे. (India tour of Bangladesh 2022 Schedule Announced)

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ‘मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आगामी द्विपक्षीय मालिकेसाठी शुभेच्छा देतो. दोन्ही देशांमधील चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. वनडे आणि कसोटी मालिकांमधील सामने रोमांचक होतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप लक्षात घेऊन दोन्ही कसोटी सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दोन्ही संघ जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करतील,’ अशी भावना व्यक्त केली.

डिसेंबरमध्ये भारताचा बांगलादेश दौरा…

अशी असेल वनडे मालिका :

4 डिसेंबर : पहिली वनडे (ढाका)
7 डिसेंबर : दुसरी वनडे (ढाका)
10 डिसेंबर : तिसरी वनडे (ढाका)

कसोटी मालिका….

14 ते 18 डिसेंबर : पहिली कसोटी (चितगाव)
22 ते 26 डिसेंबर : दुसरी कसोटी (ढाका)

Back to top button