Share Market Updates | घसरणीनंतर शेअर बाजार झाला स्थिर, सेन्सेक्स ५९,२०२ अंकांवर बंद | पुढारी

Share Market Updates | घसरणीनंतर शेअर बाजार झाला स्थिर, सेन्सेक्स ५९,२०२ अंकांवर बंद

Share Market Updates : आर्थिक मंदीच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. यामुळे गुरुवारी आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून आले. चार सत्रातील तेजीनंतर आज गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजार घसरणीसह खुला झाला. बाजार खुला होताच सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी घसरुन ५८,९०० वर होता. तर निफ्टीही घसरून १७,४०० वर गेला. त्यानंतर बाजार बंद होताना ही घसरण थांबली आणि सेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वाढीसह स्थिर झाला. सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ५९,२०२ वर बंद झाला. तर निफ्टी ५१ अंकांनी वाढून १७,५६३ वर बंद झाला. जूनच्या तिमाहीत नफ्यात २२ टक्के घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर एशियन पेंट्सचे शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. (Share Market Updates)

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरला आहे. गुरुवारी रुपया ८३.०७ पर्यंत घसरला. (Share Market Today)
आशियामधील Hong Kong चा Hang Seng निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात २ टक्क्यांनी घसरला. तर जपानचा Nikkei २२५ निर्देशांक ०.९८ टक्क्याने घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७८ टक्क्यांनी खाली आला होता.

क्रिप्टोकरन्सी पुन्हा घसरल्या

गुरुवारी सकाळी क्रिप्टोकरन्सीच्या किमती पुन्हा घसरल्या. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप १.१७ टक्क्यांनी घसरले आहे आणि यामुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९१५.६४ अब्ज डॉलरवर आहे. बिटकॉइन १९,०५७ डॉलरवर व्यवहार करत आहे आणि त्यात १.१४ टक्क्यांनी घसरण दिसून येत आहे. इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्कचे मूळ टोकन १.८० टक्क्यांनी घसरले आहे. BNB ही Binance स्मार्ट चेनची मूळ क्रिप्टोकरन्सी ०.४९ टक्क्यांनी घसरली आहे.

रुपयाची घसरण थांबेना

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे. गुरुवारी रुपया ८३.०७ पर्यंत घसरला. डॉलर मजबूत झाल्याने बुधवारी रुपया ६० पैशांनी घसरून प्रथमच ८३ च्या निचांकी पातळीवर पोहोचला होता. त्यात पुन्हा गुरुवारी घसरण झाली.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ४.५४ अब्ज रुपयांच्या ($54.71 दशलक्ष) किमतीचे भारतीय शेअर्स विकले. तर देशातील गुंतवणूकदारांनी ९.०८ अब्ज रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button