Education for children : केंद्र सरकारने जारी केली 3 ते 8 वयोगटातील बालकांसाठीची राष्ट्रीय अभ्यासक्रम रुपरेखा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – वय वर्षे 3 ते 8 मधील बालकांसाठीची राष्ट्रीय अभ्यासक्रमरुपरेखा (एनसीएफ) केंद्र सरकारकडून आज ( दि. २० ) जारी करण्यात आली. ( Education for children बाल्यावस्थेतील मुलांची काळजी आणि त्यांचे शिक्षण हे विकासाचे महत्वाचे पैलू असून त्यावर अभ्यासक्रम रुपरेखेत भर देण्यात आला आहे.
बालकांसाठीची राष्ट्रीय अभ्यासक्रम रुपरेखा हा राष्ट्रीय शिक्षणाचा भाग
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय शिक्षण लागू केले होते. बालकांसाठीची राष्ट्रीय अभ्यासक्रम रुपरेखा हा त्याचाच भाग असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी नमूद केले. आगामी वसंत पंचमीपर्यंत बालकांसाठीची शिक्षण पध्दती, अभ्यासक्रम, पुस्तके व इतर सर्व ती तयारी पूर्ण करावी, असे आवाहन प्रधान यांनी ‘एनसीईआरटी’ला केले.
अभ्यासक्रमामध्ये देशभरात समानता येणे गरजेचे असून त्यामुळे शिक्षणात सुगमता येईल.( Education for children ) पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता आज बनविण्यात आलेली रुपरेखा महत्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या बालवाटिका कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. विभिन्न भागातील 50 केंद्रीय विद्यालयांमध्ये बालवाटिका कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे. उत्तराखंड राज्यातील चार हजार शाळांमध्ये आधीपासूनच बालवाटिका कार्यक्रम राबविला जात आहे. याबद्दल प्रधान यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
हेही वाचा :
- Share Market Updates | घसरणीनंतर शेअर बाजार झाला स्थिर, सेन्सेक्स ५९,२०२ अंकांवर बंद
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील ७५ हजार बेरोजगारांना दिवाळीत नोकरीचे ‘गिफ्ट’
- दीड महिन्यात ७ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : उपमुख्यमंत्री फडणवीस