पाकिस्‍तानमधील दहशतवादाला चीनकडून ‘खतपाणी’ , ‘युनो’मधील भारताच्‍या प्रस्‍तावास विरोध | पुढारी

पाकिस्‍तानमधील दहशतवादाला चीनकडून 'खतपाणी' , 'युनो'मधील भारताच्‍या प्रस्‍तावास विरोध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि अमेरिकेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये पाकिस्‍तानमधील लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या शाहिद महमूद याला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित करण्‍याचा प्रस्‍ताव सादर केला होता. मात्र चीनने प्रस्‍तावला विरोध केला आहे. त्यामुळे चीन  भारताला विरोध म्‍हणून पाकिस्‍तानमधील दहशतवादाची पाठराखण करत असल्‍याचे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

पाकिस्‍तानमधील दहशतवादाला चीनचे समर्थन

चीनकडून सातत्‍याने पाकिस्‍तानमधील दहशतवाद्‍यांची पाठराखण केली जात आहे.  पाकिस्‍तानमधील लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या शाहिद महमूद याला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित करावे, असा प्रस्‍ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये सादर केला होता. मात्र चीनने या प्रस्‍तावला विरोध केला आहे. चीनने अशा प्रकार दहशतवाद्यांना ब्‍लॅकलिस्‍टमध्‍ये टाकण्‍यास सलग चारवेळा नकार दिला आहे.

अमेरिकेने डिसेंबर २०१६ मध्‍ये पाकिस्‍तानमधील लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या शाहिद महमूद याला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. मात्र चीनने नेहमीच याला विरोध केला आहे. आता भारत आणि अमेरिकेने संयुक्‍त प्रस्‍ताव सादर केला होता. मात्र चीनने संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेत याला विरोध केला.

 

Back to top button