Agniveer Scheme : अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी 'या' ११ बॅंकांसोबत करार
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्कराने नोंदणीकृत अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी तसेच त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी ११ बॅंकांसोबत सामंजस्य करार केला आहे. या बॅंकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अँक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि बंधन बँकेचा समावेश आहे. ( Agniveer Scheme )
लेफ्टनंट जनरल व्ही. श्रीहरी, डीजी (एमपी आणि पीएस) आणि बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच या करारांवर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अग्नीवीर वेतन पॅकेज अंतर्गत असलेली वैशिष्ट्ये आणि लाभ संरक्षण वेतन पॅकेज सारखेच आहेत. याव्यतिरिक्त, बँकांनी अग्निवीरांना त्यांच्या उद्योजकीय कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अल्पदराने कर्ज (सॉफ्ट लोन) देऊ केली आहेत. (Agniveer Scheme) अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीरांची पहिली तुकडी जानेवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण केंद्रांमध्ये सामील होणार असाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
#IndianArmy signed MoU with eleven Banks viz #SBI, #PNB, #BoB, #IDBI, #ICICIBank, #HDFCBank, #AxisBank, #YesBank, #KotakMahindraBank, #IDFCFIRSTBank & #BandhanBank to provide banking facilities to #Agniveers on enrollment. (1/3)#Agnipath pic.twitter.com/QCeJh6Ux0Y
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) October 15, 2022
हेही वाचा
- Allahabad HC : बलात्कार प्रकरणातील पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर आरोपीला जामीन
- Bebhan Movie : ‘भगव्याला महाराष्ट्र विसरला’ : ‘बेभान’ चित्रपटाचा टीजर लाँच
- पुणे : लम्पीने जिल्ह्यात 184 जनावरांचा मृत्यू, सरकारकडून 128 पशुमालकांना अर्थसहाय्य
- लोन ॲपचा सुळसुळाट – गुगल, ॲपल यांच्यावरही नोंद होणार गुन्हा – cops to book google apple in loan app cases
- World Hunger Index 2022: नामुष्कीचे वास्तव..! जागतिक भूक निर्देशांकात भारत पाकिस्तान नेपाळच्याही मागे
- Womens IND vs SL Final : श्रीलंकेचा फलंदाजांची हाराकिरी, ६५ धावांवर डाव आटोपला
- काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या; काश्मिरी पंडित रस्त्यावर – Kashmiri Pandit killed in Shopian