बीड : पतीकडून पत्‍नी आणि मुलाची साखर झोपेत असताना हत्‍या | पुढारी

बीड : पतीकडून पत्‍नी आणि मुलाची साखर झोपेत असताना हत्‍या

माजलगाव ; पुढारी वत्‍तसेवा : तालुक्यातील मजंरथ येथील काळे वस्तीत राहणाऱ्या पांडुरंग दोडताले याने पत्नी व मुलाची हत्या करुण स्वतः पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माजलगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आसलेल्या मंजरथ येथील पांडुरंग तोडताले हा राहत होता. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी व मुलगा पिन्या साखर झोपेत होते. यावेळी पांडुरंग तोडताले याने धारधार शस्त्राने हल्ला करुन पत्‍नी आणि मुलाचा खून केला. या हल्‍ल्यात पत्‍नी आणि मुलगा यांचा झोपेतच मत्‍यू झाला. या घटनेमुळे माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या खुनाची माहिती खुद पांडुरंगने माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिली. दरम्‍यान तो फरार होण्याच्या आधीच पोलिसांनी संशयीत खुनी पांडुरंग याला ताब्यात घेतले.

हेही वाचा :  

 

Back to top button