आंघोळीनंतर महिलेची गेली दृष्टी, ही चूक पडली महागात | पुढारी

आंघोळीनंतर महिलेची गेली दृष्टी, ही चूक पडली महागात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माणसांचे डोळे हे खूप नाजूक असतात. त्‍यामूळे डोळयांची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. एखादी छोटी चूक सुदृा आपली दृष्टी घालवू शकतात. अशीच एक घटना इंग्लंडमधील एका महिलेसोबत घडली आहे. या महिलेचे नाव मेरी मेसन आहे. मेरीच्या एका चूकीनंतर तीची दृष्टी गेली. तीला तिची दृष्टी जाईल असे कधीच वाटले नव्हते. परंतु तिच्याकडून एक चूक झाली अनं तीची थेट दृष्टीच गेली.

मेरी मेसन अशी गेली दृष्टी

मेरी मेसनकडून (वय 54 ) एक चूक झाली आणि तीची कायमची दृष्टी गेली. मेरी ही डोळयांमध्ये कॉन्टेक्‍ट लेन्सचा वापर करत होती. दरम्‍यान तीने लेन्स घालून आंघोळी केली. आणि त्‍या लेन्सचे तीला इजा झाली. त्‍यातून तीची दृष्टी गेली. दरम्‍यान अंघोळ करताना सूक्ष्म जीव तिचे डोळे आणि लेन्सच्या मध्ये अडकला. या सूक्ष्म जीवामूळे दुर्मिळ संसर्ग होतात. ज्यामुळे दृष्टी जाते आणि संपूर्ण अंधत्‍व येते.

१ महिन्याची वापरली होती लेन्स

बाजारात अनेक प्रकारचे लेन्स उपलब्ध आहेत. ज्याचा कालावधी हा १ दिवस, १ महिना, ६ महिने तर १ वर्ष इतका असतो. दरम्‍यान मेरीने १ महिन्याची लेन्स वापरली होती. अंघोळीच्या वेळी सूक्ष्म जीव तीच्या डोळयात गेले. आणि तिच्या लेन्समध्ये तो जीव अडकला. त्‍यामूळे हळू-हळू तिची दृष्टी गेली.

मेरीने तात्‍काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिचे तब्‍बल तीन वेळा ऑपरेशन करण्यात आले. परंतु या सगळ्याचा मेरीला काहीच फायदा झाला नाही आणि शेवटी तिचे डोळे काढावे लागले. इंग्लंडमध्ये राहणारी मेरी म्हणाली, मी शाळेच्या स्वयंपाकघरात काम करत होती. यामुळे मला नोकरी सोडावी लागली. कारण मला डोळयांमध्ये औषधामूळे खूप त्रास होत होता, असे मेरी म्‍हणाली.

आठवड्यातून 2 ते 3 दिवस जावे लागले दवाखान्यात

मेरीने असेही सांगितले की, मला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर कधीकधी त्याहूनही जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये जावे लागते. या सर्व गोष्टींमुळे मला कामावर जाता येत नाही. या संसर्गामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अनेक फेऱ्या माराव्या लागल्या, डोळ्यात अनेक प्रकारची औषधे घ्‍यावी लागली, आणि अनेक ऑपरेशन्स आणि वेदनांना सामोरेही जावे लागले, असे तीने सांगितले.

हेही वाचा

बिग बॉस मराठी सिझन चौथा Day 7 : योगेशला जेलच्या बाहेर काढले जाईल का?…  

महत्वाची बातमी: पिंपरीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचे आदेश

महत्वाची बातमी: पिंपरीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचे आदेश

Back to top button