पुणे: लोन ॲप” टोळीच्या मुख्य आरोपीसह साथीदारांवर “मोका”नुसार कारवाई | पुढारी

पुणे: लोन ॲप" टोळीच्या मुख्य आरोपीसह साथीदारांवर "मोका"नुसार कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: “लोन ॲप” द्वारे नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार ( मोका) कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर “मोका”नुसार झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

मुख्य आरोपी व टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापुर (टोळी प्रमुख), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय २९, रा. विजापुर रोड, सोलापुर) , श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापुर, सॅम्युअल संपत कुमार (वय ४० , डिकोजा रोड बेलातुर बंगलोर, कर्नाटक ), सय्यद अकिब पाशा ( वय २३, वर्षे रा. बेंगलोर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेग ( वय २२, रा.बेंगलोर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय ४२, रा. कोझीकोड अरुर केरळ ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२, रा. पडघरा, केरळ) अशी “मोका” नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

टोळी प्रमुख धीरज पुणेकर याच्या नेतृत्वाखाली संबंधित आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फसवणूक केली. पुणेकर व त्याच्या टोळीतील इतर आठ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button