पुणे : डीसीएम महाविद्यालयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ: चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन | पुढारी

पुणे : डीसीएम महाविद्यालयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ: चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे : ‘वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या पुण्यातील डी. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या महाविद्यालयाला परवानगी मिळण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेऊ. आठवडाभरात संस्थेसोबत बैठक बोलावून हा प्रश्न सोडवू,’ असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाटील यांनी डी. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेला भेट दिली. त्या वेळी येथील कालकथित एम. डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

या प्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, अध्यक्ष डी. टी. रजपूत, सिद्धार्थ शेवाळे, यशोधन शेवाळे, शिल्पाताई भोसले, प्राचार्य डॉ. नरेश पोटे, उपप्राचार्य डॉ. जे. के. म्हस्के, डॉ. बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते. ‘कालकथित एम .डी. शेवाळे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य त्यांनी पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले,’ असेही पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले. प्रा. रमेश जमदाडे यांनी आभार मानले.

Back to top button