हॉट आहे शर्वरी वाघ; ‘मुंज्या’मध्ये तरस गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स | पुढारी

हॉट आहे शर्वरी वाघ; 'मुंज्या'मध्ये तरस गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शर्वरी वाघ आपला आगामी चित्रपट ‘मुंज्या’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. हे पाहून प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला आहे. कारण या चित्रपटाच्या कथेमध्ये नवं काही तरी पाहायला मिळणार आहे. शर्वरीचे गाणे ‘तरस’ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

अधिक वाचा-

जाणून घ्या शर्वरी वाघबद्दल…

  • शर्वरी वाघचा जन्म १४ जून, १९९७ रोजी मुंबईत झाला
  • तिचे शालेय शिक्षण दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूलमध्ये झाले
  • मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये शिकलेली शर्वरी राजकीय कुटुंबातील आहे
  • शर्वरीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करणे सुरु केले
  • तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे

अधिक वाचा-

या गाण्यात अभिनेत्री शर्वरीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे आतापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक वेळा यूट्यूबवर पाहण्यात आले आहे. मुंज्या चित्रपट ७ जूनला रिलीज होणार आहे. या गाण्याबद्दल शर्वरी म्हणते, “मला जेव्हापासून हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्री व्हायचं होतं. एक मोठे डान्स नंबर करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. अशी गाणी नेहमीच मला मोहित करतात.

अधिक वाचा-

मुंज्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. निर्मिती दिनेश विजानआणि अमर कौशिक यांची आहे.

 

Back to top button