J&K News : बारामुल्लाच्या येडीपोरा, पट्टण भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक | पुढारी

J&K News : बारामुल्लाच्या येडीपोरा, पट्टण भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News : जम्मू-काश्मीरमध्ये दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चित्रगाम भागात आणि उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

J&K News “बारामुल्लाच्या येडीपोरा, पट्टण भागात चकमक सुरू झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा दल कामावर आहेत. पुढील तपशील पुढे दिले जातील,” असे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.

J&K News पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला त्या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. चकमकीच्या ठिकाणाची झडती घेतली असता, दोन एके सिरीज रायफल, ग्रेनेड आणि इतर युद्धजन्य साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याआधी मंगळवारी कुलगाम जिल्ह्यातील अवोटू गावात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सोबत भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

J&K News अलीकडच्या काळात संपूर्ण काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्या आहेत ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

J&K News : उधमपूर येथे बसमध्ये 24 तासात दुसरा स्फोट

J&K : JeM संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी बाटपोरा येथे ठार

Back to top button