J&K : JeM संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी बाटपोरा येथे ठार | पुढारी

J&K : JeM संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी बाटपोरा येथे ठार

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या चकमकीत JeM जैश इ महंमद संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला आहे. तो अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. तर दोन स्थानिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातला आहे.

J&K  ADGP काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत कुलगाम जिल्ह्यात बाटपोरा आणि अहवातू येथे 2 चकमकी झाल्या. अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या JeM संघटनेचा पाकिस्तानी दहशतवादी बाटपोरा येथे ठार झाला. तर अहवतूमध्ये 2 स्थानिक जैश दहशतवादी ठार झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

J&K तत्पूर्वी या चकमकीत एकूण दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. आणखी शोध मोहीम सुरू आहे, असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे.

कुलगाममधील अहवाटू भागात सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत एक दहशतवादी मारला गेला, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

Army Captaion : जम्मू काश्मीरमध्ये आर्मी कॅप्टनसह अधिकाऱ्याचा एलओसीवर ग्रेनेड स्फोटात मृत्यू

जम्मू- काश्मीर : पाकची पुन्हा नापाक हरकत, जवानांवर गोळीबार, BSF कडून चोख प्रत्युत्तर

Back to top button