कोल्हापूर : कुर्डू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्य ३० हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद | पुढारी

कोल्हापूर : कुर्डू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्य ३० हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 30 हजार रुपयांची लाच घेताना कुर्डू (ता. करवीर) येथील ग्राम विकास अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ग्रामविकास अधिकारी महादेव गणपती डोंगळे (वय ५६, रा. घोटवडे, ता. राधानगरी) व ग्रामपंचायत सदस्य धनाजी मारुती पाटील (वय ४७ रा. कुर्डू, ता. करवीर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयतांची नावे आहेत.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कुर्डू (ता. करवीर) येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रूपयांची मागणी महादेव डोंगळे आणि धनाजी पाटील यांनी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button