१ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी वाहनांमध्ये ६ एअरबॅग्ज लावणे सक्तीचे: गडकरी | पुढारी

१ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी वाहनांमध्ये ६ एअरबॅग्ज लावणे सक्तीचे: गडकरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  प्रवासी वाहनांमध्ये 6 एअरबॅग्ज लावण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून वाहन निर्मिती कंपन्यांना दिले  होते. आता या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2023 पासून करावी, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली.

रस्ते अपघातात मरण पावणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या केवळ एम-1 श्रेणीतील प्रवाशांसाठी हा नियम लागू केला जाणार आहे. 8 प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या साडेतीन टनपेक्षा कमी वजनाच्या गाड्या एम – 1 श्रेणीत येतात.

विशेष म्हणजे सरकारने 1 जानेवारीपासून सर्व वाहनांतील ड्युएल फ्रंटसाठी एअरबॅग्ज अनिवार्य केलेले आहे. जागतिक पातळीवरील सप्लाय चेनमध्ये बाधा आल्याने प्रवासी वाहनांमध्ये एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय एक वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button