श्रीगोंदा: मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून दोन व्यक्तींना तीनशे लोकांच्या जमावाची मारहाण | पुढारी

श्रीगोंदा: मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून दोन व्यक्तींना तीनशे लोकांच्या जमावाची मारहाण

श्रीगोंदा: पुढारी ऑनलाइन: शाळकरी मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून आनंदवाडी शिवारात  दोघा जणांना जवळपास दोनशे ते तीनशे लोकांच्या जमावाने मारहाण करत स्विफ्ट गाडी फोडल्याची  घटना घडली. दरम्यान दोन संशियताना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे. यातील एकजण पारनेर,तर एकजण श्रीगोंदा येथील असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे सध्या राज्यात मूल पळवणारी टोळी सक्रिय  समजून जमावाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याबाबत विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण असताना आज ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

सदर दोघे संशयित व्यक्ती काष्टी कडून अजनूज कडे जात असताना त्यांनी रस्त्याने चाललेल्या शाळकरी मुलाला गाडीत बसवले. त्यानंतर त्याच्या घराजवळ आल्यानंतर त्यांनी त्या मुलाकडे पैसे मागत त्याला घाबरवायला सुरुवात केली सदर मुलाने याबाबत गावात त्याच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर मोठा जमाव जमला. जमावाने या दोघा संशयितांना जबर मारहाण करत त्यांची स्विफ्ट गाडी देखील फोडली.

पोलिसांना याबाबत माहीती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक  समीर अभंग,स.फौ अंकुश ढवळे,पो कॉ किरण बोराडे,पो कॉ प्रताप देवकाते,पो ना गोकुळ इंगवले,रवि जाधव हे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रसंगावधान राखत जमावाला शांत करत सदर संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 चौकशी सूरु

पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग म्हणाले, दोन संशियत ताब्यात घेतले आहेत.त्यांच्याकडे विचारपूस सुरु आहे.

Back to top button