Negative Influences : ‘नकारात्‍मक’ संगत टाळण्‍यासाठी ‘या’ टिप्‍स तुम्‍हाला करतील मदत | पुढारी

Negative Influences : 'नकारात्‍मक' संगत टाळण्‍यासाठी 'या' टिप्‍स तुम्‍हाला करतील मदत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नकारात्‍मक विचार करणारे लोक स्‍वत:चे ते नुकसान करतातच त्‍याबरोबर ते त्‍यांच्‍या संपर्कात येणार्‍यांच्‍या मानसिक आणि शारीरिक आरोग्‍यावर परिणाम करतात. मानसिकदृष्‍टया निरोगी राहण्‍यासाठी सकारात्‍मक विचारांची गरज असते. व्‍यक्‍तिमत्त्‍व विकास क्षेत्रातील तज्‍ज्ञांच्‍या मते सकारात्‍मकता ऐवढीच नकारात्‍मक व्‍यक्‍तीमत्त्‍वाचाही मोठा प्रभाव पडत असतो. त्‍यामुळे नकारात्‍मक संगत टाळून स्‍वत:ला सकारात्‍मक ठेवण्‍यासाठी त्‍यांनी दिलेल्‍या काही टिप्‍स तुम्‍हाला निश्‍चित उपयोगी पडतील. ( Negative Influences )

नकारात्‍मक व्‍यक्‍तीमत्‍वाकडे दुर्लक्ष करा

तुम्‍ही केवळ स्‍वत:च्‍या विचारांवर नियंत्रण ठेवू शकता. तुमच्‍या बद्‍दल लोक काय विचार करतात हे तुमच्‍या हातातच नाही, हा विचार नेहमी लक्षात ठेवा. नकारात्‍मक विचार करणारे लोक हे सातत्‍याने दुसर्‍यांवर टीका करत असतात. अशा लोकांच्‍या गराड्यात तुम्‍ही सापडला तर त्‍यामुळे तुम्‍ही स्‍वत:बद्‍दल सकारात्‍मक विचार करु शकत नाही. त्‍यामुळे नकारात्‍मक व्‍यक्‍तीमत्‍वाकडे दुर्लक्ष करणे हेच फायदेशीर ठरते.

 Negative Influences : भावनिकदृष्‍ट्या अलिप्‍त रहा

नकारात्‍मक लोकांबरोबर राहिल्‍याने याचा तुमच्‍या मानसिक आणि शारीरिक दुष्‍परिणाम होतो. नकारात्‍मक व्‍यक्‍तिमत्‍वचे लोकांपासून लांब राहणेच फायेदशीर ठरते. त्‍यामुळे अशा लोकांशी मैत्री टाळा. मात्र काही कारणास्‍तव तुम्‍ही त्‍यांना टाळू शकत नसाल तर भावनिकदृष्‍ट्या अलिप्‍त राहून आपल्‍या मनातील सकारात्‍मक विचार कायम ठेवा. कारण एक सकारात्‍मक विचार हा अनेक कठीण प्रश्‍नांवर उत्तर असू शकतो.

स्‍वत:ची चूक नसेल तर आपल्‍या मतांवर ठाम रहा

तुमची चूक नसताना नकारात्‍मक व्‍यक्‍तिमत्त्‍वाचे लको तुम्‍हाला दोषी ठरवत असतील तर तुम्‍ही तुमच्‍या मतांवर ठाम राहा. नकारात्‍मक व्‍यक्‍ती ही स्‍वत:ची चूक दडपण्‍यासाठी आणि सहानभूती मिळविण्‍यासाठी सातत्‍याने दुसर्‍यांवर टीका करत असते. नकारात्‍मक विचार करणारी व्‍यक्‍ती टीका करत असेल तर ती तिची चूक आहे. मात्र संवेदनशील व्‍यक्‍ती ही टीका ग्राह्य मानतात. ही टीका गांभीर्याने घेतात. येथेच सकारात्‍मक विचार करणारी व्‍यक्‍तीही नकारात्‍मक होण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे स्‍वत:ची चूक नसेल तर आपल्‍या मतांवर ठाम रहाणे आवश्‍यक ठरते. तसेच नकारात्‍मक व्‍यक्‍तीच्‍या विचारांचे ओझे तुम्‍ही उचलण्‍याची गरज नसते. त्‍यामुळे नेहमी सकारात्‍मक विचार करा आणि आपले मानसिक व शारीरिक आरोग्‍य निरोगी ठेवा.

तत्‍काळ प्रतिक्रिया देवू नका

नकारात्‍मक विचार करणारी व्‍यक्‍ती ही सातत्‍याने दुसर्‍यांवर टीका करणारी, कोणत्‍याही गोष्‍टीला नावे ठेवणारी अशी असते. त्‍यामुळे तुम्‍ही त्‍यांच्‍या विचारावर तत्‍काळ प्रतिक्रिया देवू नका. कारण तुमच्‍या प्रतिक्रियाही नकारात्‍मक असतील आणि नकळत या प्रतिक्रिया तुमच्‍यातील सकारात्‍मक विचारांना धोकादायक ठरतील.

नेहनी प्रश्‍नांची उत्तरे शोधा, प्रश्‍न निर्माण करु नका

सर्व काही चांगले सुरु असतानाही चांगल्‍यातून वाईट गोष्‍टींचा विचार करणे हा नकारात्‍मक विचार असतो. नकारात्‍मक व्‍यक्‍ती नेहमी प्रत्‍येक गोष्‍टींवर टीकाच करत राहतो. त्‍यामुळे तुम्‍हाला अशा व्‍यक्‍तिमत्त्‍वाच्‍या आहारी न जाता आपले सकारात्‍मक व्‍यक्‍तिमत्त्‍व कायम ठेवायचे असेल तर नेहमी प्रश्‍नांची उत्तरे शोधा, सतत प्रश्‍न विचारत बसू नका कारण समस्‍या या राहणारच आहेत. यावर मात करतच आपल्‍या आयुष्‍य अधिक सूंदर करायचे असते. त्‍यामुळे सकारात्‍मक विचार करुन नेहमी तुम्‍हाला पडणार्‍या प्रश्‍नांची सकारात्‍मक विचार करुन उत्तरे शोधणे हाच उपाय ठरतो.

हेही वाचा : 

 

 

Back to top button