Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर चालावे का आणि किती चालावे? | पुढारी

Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर चालावे का आणि किती चालावे?

पुढारी ऑनलाइन डेस्क : आपल्याकडे जेवणानंतर चालावे म्हणजे जेवण चांगले पचते, असे मानले जाते. याला आपण शतपावली म्हणतो. खरोखर जेवणानंतर चालायलाच हवे का? खरेच त्यामुळे वजन कमी होते का? त्याचे आरोग्याला किती फायदे आहेत? आणि चालावे तर किती चालायला हवे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. कारण एकीकडे जेवणानंतर लगेचच व्यायाम करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात; मग चालणे हा देखील व्यायामाचाच तर एक प्रकार आहे. तरी देखील जेवणानंतर का चालायला हवे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ( Health Tips )

चालण्याचा व्यायाम हा उत्तम व्यायाम मानला जातो. हा व्यायाम लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना करता येतो. तसेच त्याला कोणतेही मशिन लागत नाही. पायातल्या शुजव्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाची या व्यायामाला आवश्यकता नसते. चालण्याचा व्यायाम कधी करता, किती वेळ करता, कसा करता यावर त्याचे शरीरावर होणारे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळेच जेवणानंतर चालावे का? विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर चालावे का चालले तर किती चालायला हवे याचे फायदे काय तोटे काय, याबाबतची माहिती ( Health Tips ) जा‍णून घेवूया.

एका अभ्यासानुसार, चालणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. सकाळी चालण्याचे फायदे सगळ्यात जास्त होतात. तसेच जेवल्यानंतर चालणे हाही व्यायामाचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र, जेवल्यानंतर खूप जास्त ही चालू नये, असेही अभ्यासक सांगतात.

Health Tips शतपावलीचे फायदे

1.) रात्री जेवल्यानंतर चालल्यास पोटाशी संबंधित इतर समस्यांवर रात्री जेवल्यानंतर चालणं फायदेशीर ठरतं. कारण यामुळे आपलं पचन तंत्र सुधारतं. शरीरावरची सूज कमी होते. बद्धकोष्ठता होत नाही.

2. ) रोज रात्री जेवण केल्यानंतर किमान 15-20 मिनिटं चाललं तरी वजन वाढण्याचा धोका टळतो. चालण्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. वजन कमी होण्यासाठी किंवा वजन वाढू नये यासाठी आपली चयापचय क्रिया उत्तम असणं आवश्यक आहे.

3.) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर चालण्याचा फायदा होतो. रात्री जेवल्यानंतरचं चालणं आपल्या रोगप्रतिकार व्यवस्थेतून विषारी घटक बाहेर पडतात. आपल्या शरीराची आतील व्यवस्था नीट काम करण्यासाठी रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला हवी.

4.) रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर चालणे फायदेशीर ठरते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. रात्री जेवणानंतर 15 मिनिटे चालण्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. तसेच हे मधुमेह असलेल्या व्यक्तिंसाठी हे फायदेशीर ठरते.

5. ) दिवसभराचा मानसिक थकवा आणि मनावरचा ताण घालवण्यासाठी देखील कमी करण्यासाठी रात्री जेवल्यानंतर चालणे फायदेशीर ठरते. आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचं हार्मोन स्त्रवतं. हे हार्मोन मनावरचा ताण घालवतो. त्यामुळे मन आनंदित होतं आणि शांत होतं.

हेही वाचा :

Back to top button