पुणे: चांगल्या परताव्याच्या नादात गमावले सोळा लाख | पुढारी

पुणे: चांगल्या परताव्याच्या नादात गमावले सोळा लाख

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शेअर मार्केटच्या ऑप्शन ट्रेडिंगच्या इक्विट रिसर्च इंडिया ग्रुपच्या ग्रोथ इनव्हेसमेंट प्लॅनमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 15 लाख 85 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात भरण्यास सांगून फसवणूक करणार्‍यांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराग शर्मा, नेहा शर्मा, विश्वास आणि बँक अकाउंटधारक व वापरकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास इंदू भूषण (46, रा. सिटाडेल सोसायटी, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान घडला.

शेअर मार्केटच्या ऑप्शन ट्रेडिंगच्या इक्विटी रिसर्च इंडिया ग्रुपच्या ग्रोथ इनव्हेसमेंट प्लॅनमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला फिर्यादीला 40 हजारांवर तब्बल 50 हजार रुपये दिले. तसेच फिर्यादींना वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकेच्या खात्यावर तब्बल 15 लाख 85 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनीदेखील पैसे पाठविले; परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा मुद्दल मिळाले नाही. फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Back to top button