IND vs AUS T20 : विराट सलामीला येणार का? कर्णधार रोहितने दिले उत्तर… | पुढारी

IND vs AUS T20 : विराट सलामीला येणार का? कर्णधार रोहितने दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात येणाऱ्या T-20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. २०) खेळवला जाणार आहे. 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील सलामीचा सामना मोहाली येथे होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्‍याने विराट काेहली सलामीला येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर दिले.

राेहित म्हणाला, सामन्यामध्ये कर्णधार म्हणून आपल्याकडे पर्याय उपलब्ध असणे नेहमीच चांगले असते. विश्वचषक स्‍पर्धेमध्‍ये खेळण्यासाठी संघात लवचिकता असणे महत्त्‍वाचे असते. खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम फलंदाजी व गोलंदाजी करावी, अशी कर्णधाराची इच्छा असते. (IND vs AUS T20)

‘आम्ही आमच्या सर्व खेळाडूंची गुणवत्ता समजून घेतो. ते सामन्यात कशी कामगिरी करु शकतात याचा विचार करून विरोधी संघासाठी रणनीती आखतो. आम्ही संघात तिसरा सलामीवीर घेतला नसल्यामुळे, आम्ही विराट कोहलीला सामन्यात सलामीला पाठवू शकतो. तो आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. त्याने सलामीवीर फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा आमच्यासाठी विश्वचषकामध्ये पर्याय आहे.’ असेही राेहितने स्‍पष्‍ट केले. (IND vs AUS T20)

संबंधित बातम्या

नुकत्याच झालेल्या आशिया चषक अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले. हे शतक त्याने ओपनिंग करताना शतक झळकावले होते. संघाला गरज असल्यास विराट कोहलीचा पर्यायी सलामीवीर फलंदाज म्हणून खेळवण्यात येऊ शकते, असेही त्‍याने सांगितले.

रोहित आणि केएल राहुल ही सलामीची जोडी

विराट कोहली आमचा तिसरा सलामीवीर म्हणून खेळवण्यात येईल. त्याला काही सामन्यांमध्ये सलामी करावी लागेल; पण केएल राहुल आमच्यासाठी T-20 विश्वचषकात सलामीला देईल. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, असेही राेहितने सांगितले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

हेही वाचा : 

Back to top button