PM MODI BIRTHDAY : मोदींच्या वाढदिनी भन्नाट ऑफर; ५६ इंच थाळी ४० मिनिटांत संपवा, ८ लाख मिळवा | पुढारी

PM MODI BIRTHDAY : मोदींच्या वाढदिनी भन्नाट ऑफर; ५६ इंच थाळी ४० मिनिटांत संपवा, ८ लाख मिळवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतातच नाही, तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांची देश चालवण्याची पद्धत, बोलण्याची शैली, राहणीमान आणि इतर देशांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे ते जगभरात लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेमुळे आणि नरेंद्र मोंदींवर असलेल्या प्रेमामुळे त्यांच्या एका चाहत्याने स्वत:च्या रेस्टॉरंटमध्ये खास ५६ इंच थाळी लाँंच करत, यावर खास ऑफर दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आज १७ नोव्हेंबरला वाढदिवस असून, ते ७२ वर्षाचे होणार आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत दिल्लीच्या ARDOR 2.1 रेस्टॉरंटने एक खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये जेवणाची ५६ इंच थाळी लाँच केली आहे आणि ही थाळी जर वेळेत खाल्यास त्या व्यक्तीला ८ लाख रूपये मिळणार असल्याचेही या रेस्टॉरंटकडून सांगण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमत्त ऑफर जाहिर करणारे हे ARDOR 2.1 रेस्टॉरंटने दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये आहे, जिथे ही थाळी तयार करण्यात आली आहे. या थाळीमध्ये ५६ प्रकारचे खास पदार्थ आहेत आणि या पदार्थांची उंची देखील 56 इंच आहे. विशेष म्हणजे या थाळीत ग्राहकांना त्यांच्या आवडीचे शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ निवडता येणार आहेत. या थाळीचे नाव देखील ‘मोदी जी थाली’ असे देण्यात आले आहे. हीच थाळी कोणत्याही व्यक्तीने ४० मिनिटांत संपवल्यास आम्ही त्याला साडेआठ लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही या रेस्टॉरंट मालकाने सांगितले आहे.

ANI च्या रिपोर्टनुसार, दिल्लीच्या ARDOR 2.1 रेस्टॉरंटला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास ५६ इंची थाळी लाँच करत अनोखी कल्पना राबवली आहे. याविषयी बोलताना, रेस्टॉरंटचे मालक सुमित कालरा म्हणतात की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल खूप आदर आहे. म्हणून आम्ही ही भव्य थाळी तयार करण्याचा विचार केला. त्यांना ही ५६ इंची थाळी भेट द्यायची किंवा त्यांनी स्वत: आमच्या रेस्टॉरंटला येऊन या थाळीचा आस्वाद घ्यावा, अशी आमची खूप इच्छा आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे ही थाळी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी आहे. आम्ही या थाळीसोबत काही खास बक्षीसेही ठेवल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Back to top button