नाशिक : दुर्गंधीयुक्त नाल्यांचा बंदोबस्त करण्याची रिपब्लिकनची मागणी | पुढारी

नाशिक : दुर्गंधीयुक्त नाल्यांचा बंदोबस्त करण्याची रिपब्लिकनची मागणी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव, इंदिरागांधीनगर, रोकडोबा वाडीतील रहिवाशांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्य विषयक समस्या, डासांचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी दुर्गंधीयुक्त नाल्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महापालिकेला केली आहे.

प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे यांनी नाशिकरोड महापालिकेतील बांधकाम विभाग अधिकारी पालवे यांना निवेदन दिले आहे. यावेळी मुरली घोरपडे, देविदास डोखे, राज निकाळे अनिल गुप्ता जावेद शेख, बिलाल शेख, मुबीन खान, सना शेख, निलोफर पिंजारी, रीना जाधव, कल्पना महाले, जेनब कुरेशी, सुमन दिगंबर, राहीन शेख, फरजाना शेख, नाजेरा पटेल, मीना साळवे, रुकय्या शेख आदी नागरिक व कार्यकर्ते निवेदन देतांना उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button